नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली . मंत्री एकनाथ शिंदे यांनी  तब्बेत उत्तम असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. (Eknath Shinde)मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील १९ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तर साेमवारी आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन  एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news