मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान पंकजा मुंडे यांनी ही नाराजी कित्येक वेळा व्यक्त केली होती. पण या दोघांमधील दुरावा कमी झाल्याचे दिसून आले आहे. (Munde and Fadanvis)
आष्टी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकडा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयम कसा राखावा याबाबत चांगले शिकता येते. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंडे पुढे म्हणाल्या की, काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. ५०-५० टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. यावेळी मी एक फॉर्म्युला दिला. म्हटलं ५० टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सुचवले आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे. त्यांनी मला बेरजेचे राजकारण शिकविले. मात्र येथे बीड जिल्ह्यात गुणाकाराचे राजकारण शिकले. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला, असे सांगत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
दोन वर्षात एखादा रस्ता मिळालेला नाही. दोन वर्षात कोणताही निधी मिळाली नाही. नवीन कामाचा एखादा नारळ फुटला का? तुमच्या लेकीने दिलेल्या बजेटच्या कामाचे नारळ फक्त फुटले आहेत. तुम्ही काळजी करु नका. लोक म्हणतील भाजपचे नाही तर आघाडीचं सरकार आहे. पण आघाडीचे सरकार असले तरी केंद्रात तुमची लेक हक्काने निधी आणण्यासाठी बसली आहे. निधीची कमतरता कमी पडू देणार नाही, असे पंकजा मुंडेंनी यावेळी म्हणाल्या.