राज्यात ८ ओमायक्रॉन बाधित वाढले, यापैकी कोणीही परदेशात गेलं नसल्याची माहिती ! | पुढारी

राज्यात ८ ओमायक्रॉन बाधित वाढले, यापैकी कोणीही परदेशात गेलं नसल्याची माहिती !

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार ओमायक्रॉन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात 8 नवीन ओमायक्रॉन बाधित आढळले. त्यापैकी 7 प्रकरणे एकट्या मुंबईत नोंदवली गेली आहेत. या 8 रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे, ज्यांचे वय 24 ते 41 वर्षे दरम्यान आहे. यापैकी 3 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत तर इतर 5 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, यापैकी कोणीही परदेशात गेलेले नाही. एक जण बंगळुरूला गेला होता तर दुसरा दिल्लीहून परतला आहे. मुंबईत सापडलेला रुग्ण हा राजस्थानचा रहिवासी आहे. या 8 रुग्णांपैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित 6 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही माग काढण्यात आला आहे. या आठपैकी 7 जणांना लस देण्यात आली आहे, तर एकाचे लसीकरण झालेले नाही.

त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या २८ झाली आहे. राज्यात आतापर्यंत 9 ओमिक्रॉन बाधितांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर 19 जणांवर राज्यात उपचार सुरू आहेत.

  • मुंबई – 12
  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 2
  • कल्‍याण डोंबिवली – 1
  • नागपूर – 1
  • लातूर – 1
  • वसई विरार – 1

हे ही वाचलं का ?

Back to top button