

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेलेल्या संपावर अजुनही तोडगा निघाला नाही. राज्य सरकार आणि एसटी संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होऊनही तोडगा निघाला नाही. दरम्यान परिवहन मंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही एसटी कर्मचाऱ्यांनी याला मान्यता दिली नाही. (parab and st workers)
यावर आज (दि.१४) एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
त्यानंतर अखेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून आजपासून बडतर्फीची कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. गेले अनेक दिवस कर्मचारी कामावर हजर न राहिल्यानं महामंडळाने हे पाऊल उचललं आहे.
सोमवारपर्यंत कामावर हजर रहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही यामुळे राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे.
राज्य सरकारच्या विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे.
या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो.
त्यानंतर तीन सुनावणी होतात त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते.
या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.