शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उद्योजिकेला लाखाे रुपयांना लुबाडले | पुढारी

शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उद्योजिकेला लाखाे रुपयांना लुबाडले

मुंबई : पुढारी ऑनलाईन :  आरे येथील एका उद्योजक महिलेला तिच्या प्रियकराने शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांना लुबाडले. संबधित महिला ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर असून संबधित युवकाची भेट एका सेमिनारमध्ये झाली होती.

संबधित उद्योजिका नवऱ्यापासून वेगळी राहते.  युवकाने तिच्‍यसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. ब्‍लॅकमेल करत ४ लाख रुपये वसूल केले. त्यानंतरही हे व्हिडिओ पीडित महिलेच्या पतीला पाठवून ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबधित महिलेने आरो पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयित पसार झाला.

पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेतला. तो दिल्लीतील कमला विहार येथे असल्याचे समजले.  त्याला अटक करण्‍यात आली आहे. कृष्णकांत अखोरी असे त्याचे नाव असून तो २५ वर्षीय आहे. मागील काही वर्षांपासून संबधित महिला आणि त्याचे संबंध होते.

शरीरसंबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

२०१६ मध्ये पीडित महिला बिहारमध्ये एका व्यक्तिमत्व विकास सेमिनारसाठी गेली होती. त्यावेळी कृष्णकांत याच्याशी तिची ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. संबधित तरुणाने संबंधांचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. काही दिवसांनंतर संबधित महिला पुन्हा पतीसोबत राहू लागली. त्यानंतर  तरुणाने शरीरसंबंधांचे व्हिडिओ पतीला पाठवून देण्याची धमकी देत महिलेकडून चार लाख रुपये उकळले.

संबधित तरुण वारंवार महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी करत होता. महिलेने नकार देताच तरुणाने अश्लिल व्हिडिओ महिलेच्या पतीला पाठवून ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. यानंतर महिलेने आरे पोलीस ठाण्यात कृष्णकांत अखोरी याच्याविरोधात तक्रार दाखल केली हाेती.

हेही वाचलं का? 

Back to top button