Maharashtra Omicron Total Cases : राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या पोहोचली १० वर

Maharashtra Omicron Total Cases : राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या पोहोचली १० वर
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात कोरोनाचा नवीन अवतार असलेल्या ओमायक्रॉन प्रकाराचे आज नवीन दोन रुग्ण आढळल्याने चिंतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार, ओमायक्रॉन बाधितांच्या दोन केसेस या मुंबईत आढळून आल्या आहेत. यासह महाराष्ट्रात बाधितांची संख्या १० वर पोहोचली आहे. (Maharashtra Omicron Total Cases)

दिल्ली आणि मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या लोकांची सखोल तपासणी आणि देखरेख केल्यानंतरही भारतात प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधून आलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीलाही सोमवारी ओमायक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली असून तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

त्याच वेळी, २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मित्रालाही ओमायक्रॉन  प्रकाराचा त्रास झाल्याचे आढळून आले आहे. मात्र दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही व्यक्तींनी फायझरची कोविड लस घेतली होती. त्यांच्या संपर्कातील पाच उच्च जोखीम आणि ३१५ कमी जोखीम असलेल्या लोकांची ओळख पटली असून त्यांची चाचणी केली जात आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Omicron Total Cases) इतर रुग्णांवर पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Omicron Total Cases : 'एस जीन ड्रॉप डिटेक्शन किट'चा अभाव

दुसरीकडे, महाराष्ट्रात ओमायक्रॉन चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'एस जीन ड्रॉप डिटेक्शन किट'चा अभाव आहे. या चाचणीमुळे संशोधकांना हे समजण्यास मदत होत आहे की रुग्णाला कोणत्या प्रकाराचा संसर्ग होऊ शकतो. अंतिम परिणाम जीनोम सिक्वेन्सिंगमधून येतो. असे मशीन एकाच वेळी ३७६ नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करते. कोविड रुग्णाला कोणत्या प्रकारच्या व्हायरसची लागण झाली आहे हे त्या तंत्राद्वारे कळते.

गेल्या पाच दिवसांत म्हणजे १ डिसेंबरपासून ४९०१ आंतरराष्ट्रीय प्रवासी जोखीम श्रेणीतील देशांमधून महाराष्ट्रात आले आहेत. गेल्या ४-५ आठवड्यांत, 'जोखीम असलेल्या देशांतून' महाराष्ट्रात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांशी सरकार सातत्याने संपर्क साधून त्यांची चौकशी करत आहे.

या देशांतील परदेशी प्रवासी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींसह महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी एकूण ८ रुग्णांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news