omicron in mumbai : मुंबईत आणखी दोन ‘ओमायक्रॉन’चे रूग्ण आढळले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

मुंबईमध्ये आज आणखी दोन ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण सापडले आहेत. हे दोघेही परदेशातून आले होते. ते जवळपास ३२० जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली असून त्या सर्वांचा शोध घेण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू झाले आहे. बाधित रूग्णांनी पी फायझर कंपनीची कोरोना लस घेतली होती. (omicron in mumbai)

यापैकी एक रूग्ण 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत आला असून तो 37 वर्षांचा आहे. तर या व्यक्तीसोबत अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांवरही मुंबईतील एका रूग्णालयात उपचार सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

राज्य सरकार अलर्टवर

राज्यात ओमायक्रॉनच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. लवकरात लवकर नागरिकांना बुस्टर डोस आणि लहान मुलांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. त्याचबरोबर जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी औरंगाबाद आणि नागपूरमध्ये योजना आखल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (omicron in mumbai)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news