डोंबिवली : गर्दीत मित्रांची कायमची ताटातूट; धावत्‍या लोकलमधून पडून तरूणाचा मृत्‍यू

file photo
file photo
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवलीकर तरूणाचा कोपर ते दिवा स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. केयूर सावळा (वय 37) असे या तरुणाचे नाव आहे. या तरूणाचा लोकलच्या गर्दीमुळे बळी गेला आहे. विशेष म्हणजे प्रवासी मित्राकडून केयूरला वाचविण्याचा प्रयत्न झाला. तथापी हा प्रयत्न निष्फळ ठरला. दरवाजात लटकून प्रवास करताना धावत्या लोकलमधून पडून केयूर जखमी झाला. बेशुद्ध अवस्थेत केयूरला टेंम्पोतून रूग्णालयात न्यावे लागले, तथापी तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

नेहमीप्रमाणे बबन शिलकर आणि केयूर सावळा हे दोघे मित्र गुरूवारी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी डोंबिवलीहून फास्ट लोकलने गर्दीचा सामना करत मुंबईकडे निघाले. हे दोघे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरी करतात. सकाळी डोंबिवलीहून मुंबई आणि संध्याकाळी मुंबईहून डोंबिवली असा एकत्र प्रवास करणाऱ्या या जिवलग मित्रांची गुरूवारी कायमची ताटातूट झाली.

लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने कसरत करत बबन शिलकर लोकलच्या डब्यात शिरला. मात्र केयूर बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकला. गर्दीमुळें केयूरला लोकलमध्ये प्रवेश करता आला नाही. बबन याने केयूर याला मदतीचा हात दिला. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. बबनच्या हातातला केयूरचा हात निसटला आणि तो दिवा स्थानकाजवळ लोकलमधून खाली कोसळला. केयूर लोकलमधून पडल्यानंतर बबन याने दिवा स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. जखमी केयूरला रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स मागितली. मात्र ॲम्बुलन्स बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. अखेर केयूरला बेशुद्ध अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पोतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. केयूरला तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

डोंबिवली स्थानकातून जास्तीच्या लोकल सोडव्यात. कर्जत-ठाणे, कसारा-ठाणे, कल्याण-ठाणे आणि ठाण्याहून परतणाऱ्या अर्थात रिटर्न लोकल सोडव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. तथापी या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news