

पुढारी ऑनलाईन डेस्क : अठराव्या लोकसभेचे धक्कादायक चित्र स्पष्ट होत आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे मिहिर कोटेचा यांचा २९ हजार ८६१ मतांनी पराभव केला.
संजय दिना पाटील यांना ४ लाख ५० हजार ९३७ (टपाल मतदान २३३३) मते मिळाली तर मिहिर कोटेचा यांना ४ लाख २१ हजार ७६ (टपाल मतदान १४८७) मते मिळाली आहेत. २१ व्या फेरीअखेर संजय दिना पाटील यांना ४ लाख ४६ हजार ११२ मते मिळाली होती. तर मिहिर कोटेचा यांना ४ लाख १५ हजार ८४७ मते मिळाली होती. प्रत्येक फेरीत पाटील यांनी कडवी झुंज दिली, त्यामुळे भाजपला विजय मिळवणे अवघड झाल्याचे दिसत होते.
राज्यात लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी ३९ ठिकाणी झाली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक फेरीगणिक आकडेवारी जाहीर करण्यात येत होती.
हेही वाचा :