

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची विजयाकडे घोडदोड सुरू आहे. दरम्यान पंधराव्या फेरी अखेर त्यांनी मुख्य प्रतिस्पर्धी भाजप महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात 43 हजार 62 मतांची आघाडी घेतली आहे.
सकाळी 8 वाजता बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतनामध्ये मतमोजणीची सुरुवात झाली. लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. तरी मुख्य सामना काँग्रेस महागाडीचे डॉ. काळगे आणि भाजप महायुतीचे खासदार शृंगारे यांच्यामध्ये दिसून आला. या दोघांतील चुरशीची लढत पाहता ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. दुसऱ्या फरीतील खासदार सुधाकर शृंगारे यांच्या 728 मतांच्या आघाडीचा अपवाद वगळता डॉक्टर काळगे यांनी उर्वरित सर्वच फेऱ्यामध्ये बाजी मारली आहे. प्रारंभी जेमतेम असणारी काँग्रेसची आघाडी उत्तरोत्तर वाढत गेली. दरम्यान 15 व्या फेरीत तब्बल 43 हजारांवर पोहोचली. टपाली मतमोजणी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. तथापि काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली गती पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
हेही वाचा :