डोंबिवली : रेल्वे स्थानकात ‘एमएसएफ’ जवानांनी वाचवले महिलेचे प्राण | पुढारी

डोंबिवली : रेल्वे स्थानकात 'एमएसएफ' जवानांनी वाचवले महिलेचे प्राण

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

धावती रेल्वे पकडण्याच्या नादात फलटावर पडलेल्या प्रवासी महिलेला ‘एमएसएफ’ जवानांनी वाचवले. ह्रदयाचा ठोका चुकवणारी ही घटना ३ डिसेंबर रोजी सकाळी ०९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

नेहमीप्रमाणे प्रवासी महिला कामाला जाण्यासाठी डोंबिववली स्थानकात आली. फलाट क्रमांक ५ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी रेल्वे आली. काही क्षणात रेल्वेने सुरू झाली. धावती रेल्वे पकडत असताना महिला फलटावर पडली. फलाट व रेल्वेमध्‍ये असलेल्या गॅपमध्ये महिला जाण्यापूर्वी कर्तव्यावर असणारे एमएसएफ जवान विवेक पाटील आणि किरण राऊत यांनी तत्परता दाखवून महिलेचे प्राण वाचवले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button