Maharashtra MLC Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची नवीन तारीख जाहीर | पुढारी

Maharashtra MLC Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची नवीन तारीख जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २४) जाहीर केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election) मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मदरासंघातील निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केले होते. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ मे रोजी या निवडणुका पुढे ढकलल्या असल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकांची नवीन तारीख आता आयोगाने जाहीर केली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • निवडणूक अधिसूचना- ३१ मे २०२४
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- ७ जून २०२४
  • अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत- १२ जून २०२४
  • मतदान- २६ जून २०२४ (सकाळी ८ ते सायंकाळी ४)
  • मतमोजणी- १ जुलै २०२४ (सोमवार)
Maharashtra MLC Election
Maharashtra MLC Election

शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका घ्याव्यात, असे निवेदन निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. याची दखल घेत या निवडणूक आयोगाने याआधी निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.

७ जुलै रोजी मुदत संपणार

मुंबई पदवीधर संघातील सदस्य विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील सदस्य कपिल हरिशचंद्र पाटील यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button