धक्‍कादायक : ओमायक्रॉन प्रादुर्भाव असलेल्या १३ देशांतून नवी मुंबईत २६ नागरिक दाखल - पुढारी

धक्‍कादायक : ओमायक्रॉन प्रादुर्भाव असलेल्या १३ देशांतून नवी मुंबईत २६ नागरिक दाखल

नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा

नवी मुंबईत ओमायक्रॉन (Omicron) प्रादुर्भाव असलेल्या 13 देशांतून 26 नागरिक नवी मुंबईत परतले आहेत. या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून ते सर्वजण निगेटिव्ह आल्याची माहिती नवी मुंबई महापालिका मुख आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी दिली. गेल्या 20 महिन्यांपासून कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसताना आता ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने या नवीन विषाणूचा पसार होऊ लागला आहे. यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपी, विभागीय आयुक्त यांच्या व्हीसी घेऊन अपडेट माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे.

राज्य शासनाच्या निर्बंधांशिवाय स्थानिक प्रशासनानेही नियम कडक केले आहेत. लसीकरणाचे दोन डोस, मास्कचा वापर आदी नियम सर्वत्र अनिवार्य करण्यात आले असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नवी मुंबईत शंभर टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, 70 टक्के नागरिकांनी दुसरा लसीचा डोस घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात २३ हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात अद्याप एकही रुग्ण सापडला नसला तरी पुणे, मुंबई आणि नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर ओमयक्रॉन प्रादुर्भाव असलेल्या देशांतून नागरिकांनी मुंबई गाठली आहे. 28 ते 30 नोव्हेंबर या तीन दिवसात नवी मुंबईत 26 नागरिक नवी मुंबई आले. हे सर्वजण कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरूळ आणि ऐरोली विभागात राहणारे आहेत.

मुंबई विमानतळावर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर लगेच नवी मुंबई महापालिकेने पुन्हा त्याच दिवसी ते नवी मुंबईत येताच त्यांची टेस्ट केली. सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आले असून सध्यास्थित त्यांना होम क्वांरटाईन केले आहे. पुन्हा तीन दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. परदेशातून प्रामुख्याने ओमयक्रॉन प्रादुर्भाव असलेल्या 13 देशांतून येणाऱ्या नागरिकांची माहिती स्थानिक विभाग प्रमुख (वॉर्ड ऑफिसला) आणि आरोग्य विभागाने ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Back to top button