Supriya Sule : 'त्या' व्हिडिओवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर | पुढारी

Supriya Sule : 'त्या' व्हिडिओवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. पण, लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमात संजय राऊत आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा जो डान्स झाला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर टीका मोठ्या प्रमाणात झाली. पण, या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

या व्हिडिओसंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, “तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं”, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या.

सोमवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पूत्र मल्हार यांच्याशी संजय राऊत यांची मुलगी पुर्वशीचा विवाह झाला. मात्र, त्याआधी आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी डान्स केला. पण, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर राजकीय वर्तुळात विरोधकांकडून टीकाही करण्यात आली.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले…

या व्हिडिओवरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवरून टीका केली. ते म्हणाले होते की, “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्यू करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावं अंधारात आहेत. जनाची नाही मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती.

हे वाचलंत का ?

Back to top button