Lok Sabha Elections 2024 : भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांना वगळले | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांना वगळले

नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून घेतली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ४० स्टार प्रचारकांची सुधारित यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. (Lok Sabha Elections 2024)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत या कारणाने भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. (Lok Sabha Elections 2024)

हेही वाचा : 

Back to top button