एकनाथ शिंदेंना धक्का; 'स्टार प्रचारक' यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश | पुढारी

एकनाथ शिंदेंना धक्का; 'स्टार प्रचारक' यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आयोगाला सादर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळा, असे निवडणूक आयोगाने शिवसेनेला आदेश दिले आहेत.

शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवसेनेने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत नमूद केले होते.

राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने दखल घेत शिवसेनेने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्या यादीतील नेते हे त्यांच्याच पक्षाचे सदस्य असल्याचे प्रमाणित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सादर केलेल्या यादीतून इतर पक्षांच्या नेत्यांची नावे वगळण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांना किमान पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी प्रवास खर्चाच्या सवलतीस नकार दिला गेला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button