काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर? | पुढारी

काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई ः काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. अमर काळे वर्धा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून लढतील अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर काळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये भेट घेतली.

संबंधित बातम्या 

वर्धा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गळ घातली होती. विदर्भात एक तरी मतदारसंघ मिळावा,असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे काँग्रेस आपला वर्धा मतदारसंघ त्यांना सोडू शकते,अशी चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीकडे विजयाची खात्री देता येईल, असा स्थानिक उमेदवारही नाही. म्हणून काँग्रेसचे आमदार अमर काळे यांनी आपले उमेदवार व्हावे, असा प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे केला जात आहे.

Back to top button