Sharad Pawar : मोदींची गॅरंटी चालणार नाही : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : मोदींची गॅरंटी चालणार नाही : शरद पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत शेतकरी, मजूर, तरुण, महिला दलित यांना आश्वासने दिली. पण ती पूर्ण केली नाहीत. त्यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, भाजपला ‘चले जाव’, करण्याची ही संधी चालून आली आहे ती फुकट घालवू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar)

Sharad Pawar :‘चले जाव’चा नारा देण्याची ही वेळ

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने देशातील जनतेचा आवाज ऐकला. त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो, असे पवार म्हणाले. मोदींची गॅरंटी आता चालणार नाही. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना मुंबईतून ‘चले जाव’चा नारा दिला होता. आता याच मुंबईतून भाजपला सत्तेतून ‘चले जाव’चा नारा देण्याची ही वेळ आहे. या देशातील प्रत्येक घटकाला मोदी यांनी मोठी आश्वासने दिली आणि त्यांची फसवणूक केली. पण आता त्यांना धडा शिकविण्याची संधी आली आहे. हुकूमशहाला पराभूत करण्यासाठी आपले मत इंडिया आघाडीच्या उमेदवारास द्या, असे आवाहन पवार यांनी केले. निवडणूक रोखेमागचा भाजपचा डाव सर्वोच्च न्यायालयाने उघड केला आहे. त्यामुळे संविधान विरोधी सरकारचा पराभव करा, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.

हेही वाचा 

Back to top button