जिल्ह्यात मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यापुढेही जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा, यावर जनजागृती करण्यात येईल. ज्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, तेथे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 42 फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), 62 स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), 29 व्हिडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.) , 9 व्हीडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) 6 खर्च पथक आणि 6 खर्च सनियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आल्याचे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.