दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असून सध्या कल्याण येथील आर्ट गॅलरीमध्ये त्याचे विलागिकरण करण्यात आले आहे. हा रुग्ण आल्यापासून कोणाच्याही संपर्कात आलेला नाही अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पान पाटील यांनी दिली.

24 नोव्हेंबर रोजी आलेला या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याने तात्काळ आपल्या नातेवाईकांना आपल्यापासून लांब राहावे अशी विनंती केली होती. त्यानंतर पालिकेला कोरोना चाचणी अहवालातून हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पालिका आरोग्य विभाग सतर्क झाले. तात्काळ या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये येऊन विलगीकरण करावे, अशी विनंती केली.

सद्यस्थितीत या रुग्णाला कोरोनामध्ये बदल झालेला ओमीक्राँन विषाणूची लागण झाली आहे का? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पानपाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. नवीन विषाणू संदर्भात पालिका विभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Back to top button