Electoral | मेघा इंजिनिअरिंग : ९६६ कोटींचे बाँड घेणाऱ्या कंपनीला महाराष्ट्रातील मोठी कामे | पुढारी

Electoral | मेघा इंजिनिअरिंग : ९६६ कोटींचे बाँड घेणाऱ्या कंपनीला महाराष्ट्रातील मोठी कामे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रोल बाँडची (निवडणूक रोखे) माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्यानंतर मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची मोठी चर्चा सुरू आहे. या कंपनीने तब्बल 960 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विकत घेतले आहेत. या कंपनीकडे देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाची पायाभूत सुविधांची कामे आहेत. (Electoral Bond)

सर्वाधिक किंमतीचे निवडणूक रोखे घेणारी कंपनी म्हणून फ्युचर गेमिंगचे नाव पुढे आले आहे, या कंपनीने तब्बल १३६८ कोटींचे रोखे घेतले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर मेघा इंजिनिअर्स या कंपनीचे नाव आहे. (Electoral Bond)

या कंपनीकडे महाराष्ट्रातील दोन मोठे प्रोजेक्ट असल्याचे NDTVने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. यात बुलेट ट्रेनसाठीचे बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स स्टेशन, ठाणे बोरिवली बोगदा या दोन कामांचा समावेश आहे. श्रीनगर आणि लडाखला जोडणारा झोजीला बोगदा याच कंपनीने बांधला आहे. (Electoral Bond)

मेघा इंजिनिअरिंग या कंपनीची स्थापना १९८९ला झाली आहे. हाय स्पीड रेल्वेसाठीच्या पायाभूत सुविधा, सर्व प्रकारच्या हवामानात कार्यरत राहतील अशा बोगद्यांची निर्मिती हे या कंपनीची वैशिष्ट्यं आहे. या कंपनीची एका वृत्तवाहिनीतही मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीची बाजारमूल्य ६७,५०० कोटी आहे. शेअर बाजारात नोंदणी नसलेल्या कंपन्यातील सर्वांत कार्यक्षम कंपनी म्हणून मेघा इंजिनिअरिंगचा उल्लेख अॅक्सिस बँक हुरून रिपोर्टमध्ये केला गेला होता. ही कंपनी हैदराबादची आहे.

हेही वाचा

Back to top button