पैसे देऊन लैंगिक सुख घेणे गुन्हा नाही : हायकोर्ट

पैसे देऊन लैंगिक सुख घेणे गुन्हा नाही : हायकोर्ट
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक सुखासाठी पैसे दिले असतील तर तो गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने देताना वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी पोलीस कारवाईत वारंगणकडे आलेल्या ग्राहकाला अटक करता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा निर्वाळा देताना, नेहरूनगर पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकून अटक केलेल्या आरोपीची जामीनावर सुटका केली.

संबंधित बातम्या : 

नेहरूनगर पोलिसांनी २०२१ मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी कारवाई करून अमीर नियाझ खानला याला ग्राहक म्हणून अटक केली होती. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानसह पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या अमीर खानने अॅड. प्रभंजय दवे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. प्रभंजय दवे यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या भारतीय दंड विधानसह पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत कारवाईलाच जोरदार आक्षेप घेतला. पोलिसांनी कारवाई करताना खान तेथे आढळून आल्याने त्याला ग्राहक म्हणून आरोपी बनवले होते. परंतू वेश्यागृहातील ग्राहक हा भादंवि कलम ३७०च्या कक्षेत मोडत नाही, असा दावा केला.

तसेच पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला. मात्र या वेश्याव्यवसायात मुलगी अल्पवयीन असल्याची कल्पना त्याला नव्हती. विशिष्ट रक्कम दिल्यानंतर महिलांसोबत लैंगिक सुख उपभोगता येईल, असे आमिष दाखवल्यानंतर तो वेश्यागृहात गेला होता, याकडे अॅड. दवे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधताना यापूर्वी कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्वाळ्याचा दाखला सादर केला. याची गंभीर दखल घेत अॅड. दवे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी अमीर खान हा तीन वर्षे कारागृहात असल्याने २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्या आणि एक किंवा दोन जामीदारांसह सशर्त जामीन मंजूर केला. तसेच खान याला खटला सुरु असेपर्यंत तीन महिन्यातून पहिल्या सोमवारी संध्याकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत संबंधित पोलीस स्टेशनला हजेरी लावणे. साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करू नये, आदी अटी न्यायालयाने आदेशात नमूद केल्या आहेत.

न्यायालय काय म्हणते?

  • वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी ग्राहक म्हणून आढळल्यानंतर पोलिसांनी खानला आरोपी बनवले होते. तथापि, वेश्यागृहातील ग्राहक हा भादंवि कलम ३७० च्या कक्षेत मोडत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
  • पैसे देऊन लैंगिक सुख उपभोगणे हा गुन्हा नसून यासाठी पैसे मोजणारा व्यक्ती अर्थात ग्राहक आरोपी नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news