‘बेस्ट ऑफ आशा’ या पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन | पुढारी

‘बेस्ट ऑफ आशा’ या पुस्तकाचे अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर हा प्रकाशन सोहळा पार पडला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सकाळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, त्यांच्या पत्नी प्रतिमा शेलार यांच्यासह जनाई भोसले, आनंद भोसले, अमेय हेटे, अंकित हेटे, प्रसाद महाडकर आणि नूतन आजगावकर आदी उपस्थित होते. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशा भोसले यांच्या टिपलेली सुमारे 42 विविध छायाचित्रे आणि त्या क्षणाच्या आठवणी अशा स्वरूपात या पुस्तकाची मांडणी आहे.

Back to top button