जे. पी. नड्डा आजपासून मुंबई दौर्‍यावर

जे. पी. नड्डा आजपासून मुंबई दौर्‍यावर

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज, बुधवारी दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर येत आहेत. मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतानाच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत नड्डा संवाद साधणार आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईतील प्रत्येकी तीन मतदारसंघांचे असे दोन क्लस्टर नक्की करण्यात आले असून त्यातील भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे, लाभार्थी संवाद कार्यक्रमात नड्डा सहभागी होतील. बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजता नड्डा यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल.

दुपारी 3 पर्यंत ते दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात टिफिन बैठक घेतील,सायंकाळी 6:30 वाजता राजगृह येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news