Agriculture Meteorological Stations : देशातील १९९, राज्यातील ११ कृषी हवामान केंद्र बंद होणार   | पुढारी

Agriculture Meteorological Stations : देशातील १९९, राज्यातील ११ कृषी हवामान केंद्र बंद होणार  

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसात विदर्भातील नागपूर,अमरावती, वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने रबी पिकांचे मोठे नुकसान केले. पुन्हा एकदा हिवाळ्यात पावसाळा राज्यातील जनतेला अनुभवास आला. आता थंडी कमी होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून, यामुळे सतत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. MAgriculture Meteorological Stations

शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. अशात अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा. मात्र, आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. Agriculture Meteorological Stations

भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये संपूर्ण देशभर 199 जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 11 कृषी हवामान केंद्राचा समावेश आहे. आता देशातील हे सर्व 199 केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशातील 30 कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,आता या केंद्राच्या माध्यमातून कार्यरत असलेले 398 कर्मचारी अधिकारी आता लवकरच न्यायालयात जाणार असल्याची माहिती हवामान तज्ञ मनेश यदुलवार यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button