Garlic Rate : लसणाच्या दरात उच्चांकी उसळी; दर १५०० रुपये किलोवर | पुढारी

Garlic Rate : लसणाच्या दरात उच्चांकी उसळी; दर १५०० रुपये किलोवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने घाऊक बाजारात दहा किलो लसणाचे दर ( Garlic Rate ) एक हजार 500 ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर 450 ते 500 रुपयांपर्यंत गेले आहेत. या भाववाढीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, स्वयंपाकघरातून लसूण हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या 

मध्य प्रदेशातील निमच, मंदसौर, जावरा, पितळिया, इंदूर भागातून दररोज 14 ते 15 ट्रकमधून लसूण येथील बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. गतवर्षी हिवाळ्यासह उन्हाळाही लांबल्याने यंदा लसणाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा फटकाही लसणाला बसला होता.

पावसाचा फटका बसल्याने भविष्यात लसूण खराब होऊन तो फेकून देण्याऐवजी लसणाला मिळत असलेल्या उच्चांकी दराचा फायदा घेण्यास शेतकरीवर्गाने सुरुवात केली आहे.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या लसणाची काढणी करून माल बाजारात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला दर्जाहीन लसूणही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. अनेक ग्राहक तर लसणाचा केवळ दर विचारून माघारी फिरत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

लसूण घाऊक दर (प्रतिकिलो) वैशिष्ट्ये ( Garlic Rate )

उटी 200 ते 350 रुपये : आकाराने मोठा, चमकदार, जाड पाकळ्या
देशी 150 ते 270 रुपये : मध्यम आकार, कमी चमकदार, लहान पाकळ्या

Back to top button