BJP News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ फेब्रुवारीला अकोल्यात 

BJP News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ फेब्रुवारीला अकोल्यात 
अकोला; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात येणार  आहेत. ना. शहा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या संचलन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील. या सोबतच  भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नेते व लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा पक्षाने संचलन समिती गठीत केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेता अमित शाह १५ फेब्रुवारी रोजी अकोल्यात दाखल होणार आहेत. आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुमारे २० संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news