Santosh Bangar Video : “तुमच्या आई -बापाला मला मतदान करायला लावा” : आ. बांगरांचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Santosh Bangar Video : "तुमच्या आई -बापाला मला मतदान करायला लावा" : आ. बांगरांचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. “दोन दिवस जेवण करू नकाच” असं म्हणत असलेला एक व्हिडिओ व्हायरलं होताना दिसत आहे. या व्हिडिओवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.  (Santosh Bangar Video)

Santosh Bangar Video : आमदार संताेष बांगर काय म्‍हणाले?

आमदार संजय बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. ते या व्हिडिओमध्ये म्हणतं आहेत की, “तुमच्या आई -बापाला मला मतदान करायला लावा. तुमचे आई-वडील जर दुसऱ्याला मतदान करत असतील तर  दोन दिवस जेवण करायचं नाही. आई-पप्पाने विचारल का जेवायचयं नाही तर सांगायचं संतोष बांगर यांना मतदान करा मगच जेवणार” या संवादानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांकडून वदवून घेतलं आहे की, कोणाला मतदान करायचं तर, संतोष बांगर यांना?

आयोगाच्या नियमांची पायमल्ली

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार  यांनी ट्वीट करत आमदार संतोष बांगर यांच्या व्हायरलं व्हिडिओवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा. नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर या व्हिडिओमध्‍ये दिसत आहेत. निवडणुकीत किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात प्रचारात लहान मुलांचा वापर करू नका हे निवडणूक आयोगाचे आदेश असताना सुद्धा सत्ताधारी पक्षातील आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार हे सगळं करतोय ते सुद्धा शाळेत जाऊन. आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या संतोष बांगरवर निवडणूक आयोग कारवाई करेल का? राज्यातील शिक्षण मंत्री स्वतःच्या पक्षातील आमदार शाळेत जाऊन हे सगळे प्रकार करत असताना झोपले आहेत का ? हे योग्य आहे का?, असा  सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा 

Back to top button