Maharashtra Politics : खुलासा कशाला करताय? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल | पुढारी

Maharashtra Politics : खुलासा कशाला करताय? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : “यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका.” या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शऱद पवार गटाच्या टीकेनंतर अजित पवार पोस्ट करत,”काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही.” अस प्रत्‍यूत्तर दिले. यानंतर  जितेंद्र आव्हाड यांनी याला उत्तर देताना   म्हटलं आहे की,” नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात”. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : तुमच्या मनातले तोंडात आले…

 शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’ वरील पोस्टमध्‍ये “नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते.”

काय म्हणाले होते अजित पवार ?

बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.४)  हल्लाबोल केला. ते म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका. माझ्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून द्या. बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे, असे समजून त्याला निवडून द्या.”

या वक्तव्यावर शरद पवार गटातून जोरदार टीका होवू लागली. आता या टीकेला अजित पवारांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, प्रत्यूत्तर देत म्हटलं होत की, “काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत; पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.”

Back to top button