

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना बुधवारी 'ईडी'ने समन्स बजावले. त्यांना गुरुवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कुंटे हे व्यस्त कामांमुळे चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
या आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे 'ईडी' मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून तपास करत आहे. 'ईडी'ने याप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे.