ब्रेकिंग: महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, महायुती सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

ब्रेकिंग: महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, महायुती सरकारचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील अयोध्येत सोमवार २२ जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त राम मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार २२ जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील माहिती ‘महाराष्ट्र भाजप’ने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती महायुती सरकारने पत्राद्वारे दिली आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)

केंद्र सरकारकडून अर्धा दिवस सुट्टी जाहीर

यापूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवार २२ जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे की, सर्व कार्यालये २२ जानेवारीला अर्धा दिवस बंद राहतील. त्यानंतर दुपारी २.३० नंतर कार्यालये सुरू होतील. तसेच काही राज्यांमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरीयाणा यांचा समावेश आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारचाही सुटीचा निर्णय

सोमवार २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होत आहे. त्या दिवशी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विविध कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणुन केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारची सर्व कार्यालये, केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व संस्था आणि आस्थापनांना लागु आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांनी २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  (Ayodhya Ram Mandir Updates)

२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, १६ जानेवारीपासुन अयोध्या मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दिवशी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. लखनऊ विद्यापीठाचे वेळापत्रक बदलुन परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश विधान परिषदेसाठी होत असलेली पोटनिवडणुक देखील एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. (Ayodhya Ram Mandir Updates)

हेही वाचा:

Back to top button