Ayodhya Ram Mandir Inauguration : मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून रामलल्लासाठी काश्मिरी केशर | पुढारी

Ayodhya Ram Mandir Inauguration : मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून रामलल्लासाठी काश्मिरी केशर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लिम मंचकडून काश्मिरी केशर भेट म्हणून देण्यात आली. या भेटीमागील भावना केवळ प्रतीकात्मक नाहीत. विविध समुदायांना जोडणार्‍या काश्मिरी परंपरेचा तो एक भाग आहे, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी शाहिद सईद यावेळी म्हणाले. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

भगवान राम हे केवळ हिंदू धर्मासाठी आराध्य आहेत, असे नाही. राम हे मुस्लिमांसह सर्वच भारतीयांनी अभिमान बाळगावा असे सर्वांचेच पूर्वज आहेत, असेही सईद म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button