Kirit Somaiya : खिचडीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप | पुढारी

Kirit Somaiya : खिचडीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पालिकेतील कोव्हिड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आज (दि.१८) त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असल्याचे म्हटले जात आहे. तर ठाकरे गटाचे सचिव आहेत. या घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “खिचडीच्या नावाखाली हजारोंचा घोटाळा झाला आहे. गरीबांसाठी असणारी खिचडी ठाकरे आणि त्यांच्या  निकटवर्तीयांनी खाल्ली आहे”. (Kirit Somaiya)

भाजप नेते किरीय सोमय्या माध्यमांशी आज (दि.१८) बोलत असताना म्हणाले ,”खिचडीच्या नावाखाली हजारोंचा घोटाळा झाला आहे. या खिचडी पाकिटमारांचा कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. खिचडी कॉन्ट्रॅक्टचे पैसे संजय राऊत यांच्या मुलीच्या खात्यावरही गेले आहेत. गरीबांसाठी असणारी खिचडी ठाकरे आणि त्यांच्या  निकटवर्तीयांनी खाल्ली. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”इडीनं इक्बाल चहल यांचीही  चौकशाी करावी.

सोमय्यांनी सुरज चव्हाण यांना ईडीनं अटक केल्यानंतर “133 कोटी रुपयांच्या कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ED ने आदित्य ठाकरे यांचे सहकारी सूरज चव्हाण याच्या अटकेचे, मी स्वागत करतो. असं ट्वीट किरीट सोमय्यांनी करत व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा 

Back to top button