ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच; नवाब मलिकांना वक्तव्यांपासून रोखण्यास उच्च न्यायालयाचा नकार | पुढारी

ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच; नवाब मलिकांना वक्तव्यांपासून रोखण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई; पुढारी ऑनलाईन

 समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यामध्ये कोणताही अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार देताना सांगितले की, या क्षणी जे काही आरोप लावण्यात आले ते चुकीचे आहेत असे म्हणता येऊ शकत नाही. तथ्याच्या आधारावर मंत्री ट्विट करू शकतात अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

ज्ञानदेव वानखेडे एनसीबीच्या मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचे वडील आहेत. त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटीचा दावा दाखल केला आहे. समीर वानखेडे तसेच कुटुंबीयांविरोधात केलेल्या विधानांच्या विरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिकांना माध्यमांसमोर तसेच सोशल मीडियात वानखेडे कुटुंबाविरोधात बोलण्यासाठी प्रतिबंध करावा, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने कोणताही दिलासा देण्याचे फेटाळल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्यमेव जयते. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील.

आर्यन खान केस प्रकरणापासून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नवाब मलिक यांनी मोर्चाच उघडला आहे. त्यांनी धर्म आणि जातीवरून वानखेडे यांच्याविरोधात दररोज एक खुलासा केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत.

आर्यन खानविरुद्ध अपराधजन्य पुरावे नाहीत : उच्च न्यायालय

Aryan khan Drugs Case प्रकरणी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला जामीन मिळाला आहे. आता उच्च न्यायालायने दिलेल्या जामीन आदेशातील महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या आदेशात न्यायालायाने म्हटले आहे, की आर्यन खान याच्या विरुद्ध अपराधजन्या पुरावे नाहीत. आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसेच आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मनुमुन धमेचा यांनी एकत्र येत बेकायदेशीर रित्या ड्रग्ज घेऊन गुन्हा करण्याची योजना आखली होती असे कोणतेही पुरावे आढळत नाही. यामुळे आर्यन खानला या केसमध्ये मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

Aryan khan Drugs Case न्यायालयाने आदेशात पुढे म्हटले आहे, फक्त क्रूझवर फिरण्याच्या आधारावर कोणावरही आरोप लावता येणार नाही. तसेच आर्यन खान याच्या व्हॉटसअप् चॅटमध्ये देखिल काही आक्षेपार्ह असे आढळलेले नाही. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा हे एकत्र होते असा कोणताही पुरावा नाही. तसेच मुनमुन धमेचा हिचा कडून जे ड्रग्ज मिळाले आहे ते विक्री करण्यात इतके नाही त्यामुळे या लोकांचा ड्रग्ज विक्रीची योजना होती अशी कोणतीही शक्यता वाटत नाही.

हे ही वाचलं का ?

Back to top button