मुंबई : गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बृहन्मुंबईतील ५८ बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता 'म्हाडा'तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी दि. १४ सप्टेंबर, २०२३ पासून राबविण्यात येणार्‍या या विशेष अभियानामध्ये गिरणी कामगारांची कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता 'म्हाडा'तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण १,०४,९६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८१,८२५ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.  यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

तसेच पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इएसआयसी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. हे अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news