नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…

नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…
Published on
Updated on

इगतपुरी; पुढारी वृतसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) जन मन कार्यक्रम व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महा अभियान अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती रण आणि भाऊसाहेब रण या केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

भारती आणि भाऊसाहेब हे बहीण-भाऊ आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासह आईवडील देखील उपस्थित आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती या विद्यार्थिनीशी मराठीत संवाद साधला. तसेच पुढील आयुष्यात कोणते ध्येय प्राप्त करायचे, याबाबत इच्छा जाणून घेतली. पंतप्रधानांनी नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरात स्वच्छता करत संदेश दिला. हाच संदेश या कार्यक्रमात पुन्हा देत नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी पर्यंत देशातील सर्व मंदिरात स्वच्छता करण्याचे आवाहन केले.

कावनईचे सरपंच सुनिता पाटील व गोपाळ पाटील यांनी कावनई येथील कपिलधारा तीर्थ क्षेत्र येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आदिवासी आयुक्त नयना गुंडे, आयुष्यमान भारतचे मिलींद शंभरकर, सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, आदिवासी विकास आयुक्तलयाच्या लिना बनसोड, प्रांत अधिकारी रविंद ठाकरे, मुख्यकार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, तुषार माळी, तहसिलदार अभिजित बारावकर, गटवकास अधिकारी सोनिया नाकोडे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, उदय जाधव, दिलीप चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, रमेश परदेशी, रवि गव्हाणे, विशाल चांदवडकर, ग्रामसेवक अरविंद ठाकरे, ग्रामसेविका ज्योती केदारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विज कनेक्शन देणे, पीएम किसान क्रेडिट कार्ड योजना, रेशनकार्ड वाटप, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड वाटप, पीएम सन्मान निधी योजना, जनमन घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, रोजगार योजना, गरोदर माता योजना आदी योजनेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कावनईचे ग्रामसेवक अरविंद ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news