Kamal Pardeshi passed away: ‘अंबिका मसाले’च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | पुढारी

Kamal Pardeshi passed away: 'अंबिका मसाले'च्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क :Kamal Pardeshi passed away अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी (वय ६३) यांचे निधन झाले. दौंड तालुक्यातील खुटबाव या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कमल परदेशी या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढा देत होत्या. परंतु मंगळवारी (दि. २) वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे २३ वर्षापूर्वी बचत गटातील महिलांना एकत्रित करत त्यांनी अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला होता. स्वतः निरक्षर असूनही आपल्या मसाल्याचे मार्केटिंग त्यांनी जगभरात केले. आपल्या मसाला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला कामे देत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली होती.

कोरोनातील लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली होती, परंतु त्यानंतर देखील मोठ्या जिद्दीने त्यांनी आपला व्यवसाय वाढवला होता. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना व्यवसाय उभा करण्यास मोलाची मदत केली होती. नऊवारी साडीतील प्रसिद्ध उद्योजिका म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी उभारलेल्या अंबिका औद्योगिक मसाला केंद्र या ठिकाणी जर्मनीच्या गव्हर्नर यांनी भेट दिली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.(Kamal Pardeshi passed away)

कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. अंबिका मसाल्यांना देशभरात मोठी मागणी आहे.

हेही वाचा:

Back to top button