

पुढारी ऑनलाईन डेस्क: तुम्ही जसे पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्लीला जाता, तसे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही दिल्लीला जा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान बारामती येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. (Supriya Sule)
आपल्या कृषी प्रधान भारत देशाला आज फुल टाईम कृषी मंत्री नाही. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे हा आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर एसीमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Supriya Sule)
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आली आहे. कांदा, दूध, सोयाबीन व कापसाला आज भाव मिळत नाही आहे त्याच्यावर आम्हाला बोलू द्या एवढीच फक्त मागणी आम्ही केली होती. त्यामुळे आमचे संसदेतून निलंबन केले गेले; तरी देखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.