पुढारी ऑनलाईन डेस्क: २३ जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबीर होणार आहे. दरम्यान सत्याच्या युद्धाला नाशकातून म्हणजे या शिबीरापासून सुरूवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ते आद नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख नेते नाशकात लवकरच दाखल होतील, असे देखील राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
पुढे बोलताना राऊत म्हणाले, २३ तारखेला नाशकात शिवसेनेचं महाशिबीर होणार आहे. दरम्यान या महाशिबीराला शिवसेनेचे नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेच्या या महाअधिवेशनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. तसेच २०२४ च्या लोकसभेचे रणशिंग देखील या महाअधिवेशनातून फुंकणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. (Sanjay Raut)
आयोध्येवर बोलताना आम्हाला आयोध्या नवीन नाही. मोदींपेक्षा आम्ही जास्त वेळा आयोध्यात गेलो आहोत. मग अडवानींना आमंत्रण का नाही? असा सवाल देखील संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे. (Sanjay Raut)