पुढारी ऑनलाईन डेस्क : "पुंछमधील दहशतवादी हल्ला हा पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती आहे. सरकार झोपले आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजपला जवानांच्या बलिदानावर राजकारण करायचे आहे का? 2024 मध्ये पुलवामाच्या मुद्द्यावर पुन्हा मत मागायचे? पुंछच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला तर ते आम्हाला दिल्ली किंवा देशाबाहेर हाकलून देतील."
माध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे ५ जवान शहीद झाले असून २ जण जखमी झाले आहेत. या संदर्भाने माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, "पुछं हल्ला हा मिनी पुलवामा हल्ला आहे. पुलवामा वेळी देखील सरकार झोपलं होतं आणि आताही. अतिरेक्यांकडून आपल्या जवानांच्या हत्या होत आहेत हे दुर्देव आहे. शहीद जवानांवर सरकार राजकारण करु पाहत आहे. सरकार कोणता उत्सव साजरा करत आहे. पुछबाबत काही विचारल्यास आम्हाला देशाबाहेर काढेल हे सरकार.
राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, "राममंदिर कोणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही आहे. अद्याप राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच निमंत्रण ठाकरेंना आलेलं नाही. राममंदिर उभारणीच्या लढ्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. रामंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे श्रेयवादाचा प्रयत्न अस म्हणतं त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा