Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला | पुढारी

Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची ११ डिसेंबर रोजी राज्य सरकारने नियुक्ती केली होती. मात्र अधिवेशन सुरू असल्याने डुंबरे नागपुरला होते. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता ठाणे पोलीस आयुक्त पदाचा त्यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर जयजित सिंग हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

डुंबरे हे राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त होते. यापूर्वी डुंबरे यांनी ठाणे सह आयुक्त, मुंबई गुन्हे सह आयुक्त, एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांना ठाणे आयुक्तालयाची परिपूर्ण माहिती आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button