Maharashtra Politics | “कोई न बोले झूठ…”, नवाब मलिक-पटेलांचा फोटो शेअर करत राऊतांची खोचक पोस्ट | पुढारी

Maharashtra Politics | "कोई न बोले झूठ...", नवाब मलिक-पटेलांचा फोटो शेअर करत राऊतांची खोचक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसाचे कामकाज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून गाजले. दाऊदच्या नातेवाईकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारावरून मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. तुरुंगात असलेले मलिक वैद्यकीय कारणास्तव जामिनावर सुटले. त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात कामकाजात सामील झाले. नवाब मलिक हे शरद पवार की अजित पवार गटात आहेत, हा संभ्रम होता. पण ते सभागृहात आले आणि थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांत सुरु आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्या सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. (Maharashtra Politics)

संजय राऊय यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे दिसत आहेत.

Maharashtra Politics : कोई न बोले झूठ…

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मलिक यांना ईडीने अटक केली. मलिक यांनी जामिनावर सुटल्यानंतरही ते कोणत्या गटात जाणार, ही भूमिका स्पष्ट केली नव्हती, पण त्यांच्या सभागृहातील आसनव्यवस्थेने त्याचा उलगडा झाला. दरम्यान, फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास नकार दिला. पण त्यांच्या पत्राने अजित पवार गटाची कोंडी झाली. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी त्यांच्या ‘X’ अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांचाही फोटोही शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,

ऐसी बात बोलिए,
के कोई न बोले झूठ…
और ऐसी जगह बैठिए
के कोई न बोले उठ..!

संजय राऊत यांच्या या खोचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा 

Back to top button