मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुका चार टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच त्याबाबतचे संकेत दिले आहेत.
या नेत्याच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील राहिलेला भाग आणि चौथ्या टप्यात उत्तर महाराष्ट्र अशाप्रकारे हे चार टप्पे असू शकतात. येत्या मार्च आणि एप्रिलमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत त्याबाबतची घोषणा होणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रशासकीय पातळीवर सुरुवात झालेली आहे.