मुंबई ; माजी महापौर दत्‍ता दळवींना जामीन मंजूर | पुढारी

मुंबई ; माजी महापौर दत्‍ता दळवींना जामीन मंजूर

भांडुप : पुढारी वृत्‍तसेवा :  मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. दरम्‍यान आज १५ हजारांच्या जातमुचलक्‍यावर दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अपशब्‍द वापरल्‍याप्रकरणी दत्ता दळवींना (दि.२९) रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर भांडुपमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. (दि.३०) रोजी अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोडही केली होती. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान आज दत्‍ता दळवींना १५ हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र भांडुप पोलिसांनी त्‍यांना जामीन देण्यास विरोध केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्‍ता दळवी यांना अखेर आज शुक्रवार दि १ रोजी मुलुंड न्यायालयाने पंधरा हजार रूपयांच्या श्यूअरिटी वर जामीन मंजूर केला असून, आजच त्यांची ठाणे कारागृहातून मुक्तता होणार आहे. दि २७ रोजी शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी भाषण केले होते. या भाषणात त्यानी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली होती. या बाबत शिंदे गटाच्या वतीने भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांनतर भांडूप पोलिसांनी दळवी यांना अटक केली होती. दोन दिवसात जामीन न झाल्याने त्यांना दोन दिवस ठाणे कारागृहात काढावे लागले होते. मात्र शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर झाला असून, संध्याकाळ पर्यंत त्यांची मुक्तता होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button