‘राईझ अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा; मिशिका चौबेला दुहेरी सुवर्णपदक

‘राईझ अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा; मिशिका चौबेला दुहेरी सुवर्णपदक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'राईझ अप' महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 9 वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये 100 मीटर आणि 50 मी. धावणे प्रकारात द कल्याणी स्कूलच्या मिशिका चौबे हिने उत्तम वेळ नोंदवीत दुहेरी सुवर्णपदक पटकाविले. दै. 'पुढारी' आणि पूना डिस्ट्रिक्ट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बाबूराव सणस क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 9 वर्षांखालील 100 मीटर धावणे प्रकारात द कल्याणी स्कू लच्या मिशिका चौबेने 15.6 सेकंदाची वेळ नोंदवित सुवर्ण, ए. पी. एस.च्या अरोही गारगोटे हिने 15.8 सेकंदाची वेळ नोंदवित रौप्य तर जीजीआय इं. स्कूलच्या सानवी पाल हिने 16.1 सेकंदाची वेळ नोंदवित कांस्यपदक पटकाविले.

50 मीटर धावणे प्रकारात द कल्याणी स्कुलच्या मिशिका चौबे हिने 8.3 सेकंदाची वेळ नोंदवित सुवर्ण, जीजीआयएसच्या सानवी पालने 8.5 सेकंदाची वेळ नोंदवित रौप्य तर एपीएसच्या अरोही गारगोटेने 8.7 सेकंदाची वेळ नोंदवित कांस्यपदक पटकाविले. लांब उडी प्रकारात कल्याणी स्कूलच्या अपर्णा चव्हाण हिने 1.87 मीटर लांब उडी मारत सुवर्ण, जीजीआयएसच्या ऋतुजा कोठालेने 1.86 मीटर मारत रौप्य तर परिणीली यादवने 1.82 मीटरसह कांस्यपदक पटकाविले. 4 बाय 50 मीटर रिलेमध्ये पिंपरीच्या जीजीआयएसने 36.84 सेकंदात पूर्ण करीत सुवर्ण, द कल्याणी स्कूलने 37.52 सेकंदात पूर्ण करीत रौप्य तर आर्मी पब्लिक स्कूलने 37.52 सेकंदात पूर्ण करीत कांस्यपदक पटकाविले.

दै. 'पुढारी' च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 'राईझ अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या राईझ अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जलतरण स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. 'पुढारी' हा एकमेव माध्यम समूह आहे.

या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक विजेते):

9 वर्षांखालील : 30 मी. : 1) आरोही गारगोटे (आर्मी पब्लिक स्कूल), 2) राजेश्वरी गायकवाड (अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल), 3) जियाना शहा (कॅलम हायस्कूल). 11 वर्षांखालील : लांब उडी : अनन्या शर्मा (जीजीइ स्कूल, 3.55), स्पृहा पांगारे (बालशिक्षण मंदिर, 3.74), आराध्या गायकवाड (अहिल्यादेवी स्कूल, 3.62). 80 मीटर धावणे ; रियांशी गावडे (पोद्दार इं. स्कूल, 11.7), प्रांजल थोरात (कॅम्ब्रीज इं. स्कूल, 12.0), अधिरा पवार (कर्मिल कॉ. हायस्कूल, 12.3). 200 मीटर धावणे : प्रांजल थोरात (कॅम्ब—ीज स्कूल, 30.13), आराध्या वाघमारे (सीएमएस, 31.0), अधिरा पवार (कॉर्मेल स्कूल, 32.0). उंच उडी ; कमायरा मुलचंदानी (कल्याणी स्कूल), प्राप्ती जाधव (जीजीआयएस स्कूल), गीत दिघे (जीजीआयएस स्कूल). 4 बाय 50 मी. : अहिल्यादेवी हायस्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, बाल शिक्षण मंदिर.

13 वर्षांखालील : 80 मीटर धावणे : कस्तुरी चव्हाण (जीआरपीएस नारायणगाव, 10.14 से), भार्गवी देशमुख (अमृता विद्यालय, 10.36 से), वेदिका पाटील (बाल शिक्षण इं. स्कूल, 11.23 से). गोळाफेक l; जयनी पाटील (माऊंट कार्मेल हायस्कूल), गधांली कुलकर्णी (डी.इ.एस स्कूल), अनन्या कुलकर्णी (मुक्तांगण स्कूल). थाळी फेक : जयनी पाटील (माऊंट कार्मेल हायस्कूल, 19.65 मी), अनन्या कुलकर्णी (मुक्तांगण स्कूल, 15.66 मी.), ज्ञानेश्वर बोरकर (भैरवनाथ स्कूल, भोसरी, 13.15 मी). 200 मीटर धावणे : कस्तुरी चव्हाण (गु. रा. प. सबनीस नारायणगाव, 26.20 से), भार्गवी देशमुख (अमृता विद्यालय, 27.10 से), राजनंदिनी मोहिते (सिम्बायोसिस, 29.74 से). 80 मीटर अडथळा शर्यत : कस्तुरी चव्हाण (गु. रा. प. सबनीस नारायणगाव, 13.55 से), निवॉ शेख, विद्या लाडे (कल्याणी स्कूल, 19.52 से). उंच उडी : शिरीन आडकर (कलमाडी हायस्कूल), रावी रोकडे (कलमाडी हायस्कूल), मृनाली डावरे(स्टर्लिंग स्कूल). 4 बायह्म100 मी.रीले : अभिनव इंग्रजी माध्यम, मार इवेनियस स्कूल, जीजीआयएस स्कूल. 50 मी. : मिताली भांबरे (विखे पाटील), वेदिका पाटील (बाल शिक्षण मंदिर), 3) अनुषा फडतरे (अभिनव इंग्लिश मीडियम).

15 वर्षांखालील : 80 मीटर धावणे : यशश्री सकपाळ (विखे पाटील स्कूल, 10.5 से.), भुमी देशपांडे (मुक्तांगण इं. स्कूल, 10.8 से.), शर्वरी सोनवणे (सेंट  फ्रांन्सिस स्कूल, 11.05 से.). 600 मीटर धावणे : दक्षा नहार (विजय वल्लभ स्कुल, 1.48.6 से.), नेमा मच्छा (सरदार दस्तुर स्कूल, 1.50.6 से), आदिती तांबे (ज्ञानांकुर स्कुल, 1.54.7 से.). 4 बाय 400 मीटर रिले : विख पाटील स्कुल (5.11.7 से.), बी. जे. एस. वाघोली (5.26.5 से.), श्री म्हातोबा मा. वि. आळंदी (5.47.3). 200 मीटर धावणे : यशश्री सकपाळ (विखे पाटील, 26.25 से), शर्वरी सोनवणे (सेंट फ्रांन्सिस, 27.61 से), सिया गुगळे (कॅलम हायस्कूल, 28.20 से). गोळाफेक : संजय चैनानी (सेंट मॅरी स्कुल, 9.70 मी), आदिती देवळे (सेंट मिराज स्कूल, 7.94 मी.), स्वरा पाटील (ग्लोबल इंडियन स्कुल, 7.93 मी). 80 मी अडथळा शर्यत : मानसी देवरे (अराईझिंग, 17.97 से), दक्षा नहार (विजय वल्लभ स्कूल, 18.01 से), अद्या घुमरे (विखे पाटील स्कूल, 18.23 से). 1000 मीटर धावणे : दक्ष नहार (विजय वल्लभ स्कूल, 3.28.4), आदिती तांबे (ज्ञानांकुर इं. मीडियम, 3.43.5), श्रध्दा निकाम (न्यू. मॅफहॅन—ी, 3.49.7). लांब उडी : आरोहि दिवेकर (बी. एस. एम. 4.58 मी), आर्या ढेकणे (शिवाजी स्कूल 4.48 मी), ऋतुजा धोतरे (सी.पी.एस.एम, 4.24 मी). 4 बाय 100 मी. रीले : विखे पाटील हायस्कूल, अभिनव इंग्रजी माध्यम, 3) भारतीय जैन संघटना.

17 वर्षांखालील : 400 मीटर धावणे : अंकिता इंगुळकर (एसएसएनबीएन, नसरापूर), भारती महांगडे (एसपी कॉलेज), सेजन साप्ते (अभिनव विद्यालय). थाळी फेक : काव्या कुलकर्णी (मुक्तांगण स्कूल), भक्ती मोरे (अराईझ इंटरनॅशनल स्कूल), अनुराधा पवार (सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल). 100 मीटर धावणे : अंकिता इंगुळकर (एसएसबीएन, नसरापूर), भारती महांगडे (एसपी कॉलेज), स्मृती सुभाष (जीजीआयएस). 800 मीटर धावणे : मानसी यादव (बीजेएस, वाघोली), आदिती हरगुडे (बीजेएस, वाघोली), सृष्टी हंडगर (बीजेएस, वाघोली). 4 बाय 400 मीटर रिले धावणे : मानसी यादव (बीजेएस, वाघोली), तानिया पवार (एस एस व्ही एन, नसरापूर), तन्वी बाजपे (जी जी आय एस, पिंपरी). 80 मीटर अडथळा शर्यत ; मयुरी झांब्रे (एस. ए. स्कुल), रिध्दी म्हंकाळे (मॉडर्न कॉलेज), पल्लवी भोसले (वाडिया कॉलेज). गोळाफेक : काव्या कुलकर्णी (एकलव्य अ‍ॅथलेटिक्स रेसिंग फिटनेस), पलक पांडे (रेसिंग फिटनेस क्लब), भक्ती मोरे (अराईज इंटरनॅशनल). 1500 मीटर धावणे : मानसी यादव (बीजीएस, वाघोली), आदिती हरंगुळे (बीजीएस, वाघोली), वैष्णवी खाडे (म्हातोबाची आळंदी). लांब उडी : समरिध्दी वाल्हेकर (बनेश्वर), पलक पांडे (रेसिंग फिटनेस क्लब), स्मि—ती सुभाष (जी.जी.आय.एस., पिंपरी). उंच उडी ; तनिष्का बचवे (जी जीआय स्कूल), समृद्धी सरडे (रा.प.सबनीस), रिद्धी महांकाळे (मॉडर्न कॉलेज). 4 बाय 100 मी. रीले. : श्री शिवाजी विद्यामंदिर नसरापूर, बी. जे. एस. वाघोली, जी.जी.आय.एस.

19 वर्षांखालील ; 400 मीटर धावणे : सोजस गलबते (एस. पी. कॉलेज), समिक्षा सपकाळ (मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड), अस्मिता जाधव (वाडिया कॉलेज), 100 मीटर धावणे : गार्गी चिरडे (ज्ञानगंगा ज्यु. कॉलेज), अनन्या अवेरे (बाल शिक्षण मंदिर), समिक्षा सकपाळ (मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड). 800 मीटर धावणे : सोजस गलबते (एस.पी. कॉलेज), साक्षी मुंदडा (कल्याणी स्कूल), स्वराली जगदाळे (न्यू. इं. स्कूल, बिजलीनगर). 4 बाय 400 मीटर धावणे : बालशिक्षण मंदिर इ. मि. स्कूल आणि द कल्याणी स्कूल. गोळाफेक : धृवा पुढाणे (सिंहगड कॉलेज), सिध्दी भोसले (पीईएससी), राधा अहिर (लोणकर विद्यालय). 3000 मीटर धावणे : साक्षी बारोडे, अमृता मांढरे, राधा आहिर (लोणकर विद्यालय). लांब उडी :  अनन्या आवारे (बीएसएम), साक्षी खान (सिम्बायोसिस), नयना पुरी (कल्याणी कॉलेज). थाळी फेक : प्रया कानसकर (डी. वाय. पाटील), सिध्दी भोसले (जयहिंद हायस्कूल), रिया परदेशी (सेठ दगडूराम कटारिया स्कूल). 4 बाय 100 रिले : बालशिक्षण मंदिर, मॉडर्न कॉलेज, कल्याणी स्कूल. 1500 मीटर धावणे : साक्षी बोराळे (वाडिया कॉलेज), विशाखा शिंदे (एस. पी. कॉलेज), सोजस गलबते (एस. पी. कॉलेज). उंच उडी : जुई पसळकर (स. प. महाविद्यालय), ऋतुजा धोडमिसे (स. प. महाविद्यालय), तन्मयी शेंडकर (सरदार दस्तुर हायस्कूल). 4 बाय 100 मी.रीले : बालशिक्षण मंदिर, मॉडर्न कॉलेज, द कल्याणी स्कूल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news