Supriya Sule: ‘कर्तव्य पार पाडण्याची हीच ती वेळ’; खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन | पुढारी

Supriya Sule: 'कर्तव्य पार पाडण्याची हीच ती वेळ'; खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ही  शेतकऱ्यांसाठी मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची ही ती वेळ आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला केले आहे. (Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील अवकाळीचा आढावा घेतला आहे. दरम्यान सुळे यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या या कठिण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पाहणी पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करावी. शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभा करण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे, असे देखील म्हटले आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेली पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केली आहे. (Supriya Sule robotics expert)

Supriya Sule: संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करायला हवा

सुळे यांनी पुढे म्हटले आहे की, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवल्यास केंद्र सरकारचे पथक जाऊन त्या ठिकाणची पाहणी करीत. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. त्यामुळे आता देखील राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा. यासाठी केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करण्याची मागणी राज्य सरकारने करावी असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (Supriya Sule)

हेही वाचा:

Back to top button