Bawankule Vs Raut : ‘आ बैल, मुझे मार’, संजय राऊतांचे नवे ट्वीट

Bawankule Vs Raut
Bawankule Vs Raut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्यातील राजकीय नेत्‍यांमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र कायम आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (२०) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला होता. यानंतर बावनकुळेंसह  भाजपने त्‍यांना सडेताेड प्रत्‍युत्तर दिले. आज (दि.२१) संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, "भाजपने हिट विकेट घेतली आणि घोषणा केली की चित्रातील व्यक्ती 'त्यांचा' प्रदेशाध्यक्ष" (Bawankule Vs Raut)

Bawankule Vs Raut : भाजपने हिट विकेट घेतली

संजय राऊत यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी माझ्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले किंवा आरोप केले नाहीत? मी माझ्या साध्या ट्विटमध्ये एवढेच म्हटले आहे की, महाराष्ट्र जळत आहे आणि 'काही निरो मकाऊ (चीन) मध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहे …' पण भाजपने हिट विकेट घेतली आणि घोषणा केली की चित्रातील व्यक्ती 'त्यांचा' प्रदेशाध्यक्ष (!) बरं, बरं, बरं… यालाच तर हिंदीत म्हणतात – 'आ बैल, मुझे मार'!!

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी म्‍हटलं हाेतं की, "भाजपसारखा डरपोक पक्ष पाहिलेला नाही आणि देशाला नैतिकतेचे धडे देणारा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजप म्हणजे जुगार पार्टी. सोमवारी (दि.२०) केलेल्या पोस्ट संदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, मी केलेल्या पोस्टमध्ये कुठेही बावनकुळेंचे नाव घेतले नव्हते. पण भाजपनं माझी पोस्ट अंगावर का घेतली. आणि आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करताना भान ठेवा. त्यांच्या  ग्लासमध्ये डाएट कोक आहे".

फोटो खा. संजय राऊत यांचे 'X' अकाउंटवरुन घेण्यात आला आहे.
फोटो खा. संजय राऊत यांचे 'X' अकाउंटवरुन घेण्यात आला आहे.

काय होते संजय राऊत यांची पोस्ट

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आपल्या 'X' खात्यावर सलग तीन पोस्टसह बावनकुळेंचे फोटो शेअर करत जुगाराचे गंभीर आरोप केले. त्यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्र पेटलेला आहे. आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा.ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…" तर पुढील पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की,"19 नोव्हेंबर मध्यरात्री, मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?" तिसरी पोस्ट करत म्हटलं आहे की,"ते म्हणे फॅमिलसह मकाऊला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे. कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!"

ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय… भाजपचे सडेताेड प्रत्‍युत्तर

संजय राऊतांच्या आरोपानंतर भाजप गटातील लोकांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने आपल्या 'X' खात्यावर आदित्य ठाकरेंचा फाेटाे पोस्ट करत म्हटलं आहे की,""आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्‍हिस्‍की?

फोटो भाजपा महाराष्ट्र यांचे 'X' अकाउंटवरुन घेण्यात आला आहे.
फोटो भाजपा महाराष्ट्र यांचे 'X' अकाउंटवरुन घेण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news