शब्‍दांमध्‍ये मांडता येणार नाही असे दु:ख : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

शब्‍दांमध्‍ये मांडता येणार नाही असे दु:ख : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनामुळे इतिहास आणि सांस्‍कृतिक क्षेत्रामध्‍ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शब्‍दांमध्‍ये मांडता येणार नाही असे दु:ख मला झाले आहे, अशा शब्‍दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांच्‍या अधिकृत ट्‍विटर हॅण्‍डलवरुन बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या भेटीदरम्‍यानचा फोटो ट्‍विट करत त्‍यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटलं आहे की, बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनामुळे इतिहास आणि सांस्‍कृतिक क्षेत्रामध्‍ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे भावी पिढ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याशी जोडलेल्‍या राहतील. त्‍यांनी केलेले कार्य नेहमीच स्‍मरणात राहील, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या शोकसंदेशात नमूद केले आहे.

 

Back to top button