नवी मुंबई: राजेंद्र पाटील : खासदार, आमदार, न्यायाधीश, आयएएस, आयपीएस आणि आयएफएस, प्राप्तीकर, सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील भारतीय महसूल सेवा, भारतीय विदेशी सेवेतील अधिकाऱ्यांसाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ३५० सदनिकांचे श्री आणि फोर बीएचकेचे आलिशान टॉवर सिडको उभारणार आहे.
या गृहसंकुलात नोंदणी करण्यासाठी आणि एक लाख रुपये नोंदणी शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यासाठी सिडकोने प्रती चटई क्षेत्रफळानुसार १९ हजार ३०३ रुपयांचा दर निश्चित केला आहे. या घरांची किंमत ही २ कोटी ४५ लाख ते ३ कोटी ४७ लाख एवढी असू शकेल.
ही गृहसंकुल योजना महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसह खासदार, आमदार, न्यायाधीश आणि महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र असलेले प्राप्तीकर, सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील भारतीय महसूल सेवा, भारतीय विदेशी सेवेतील अधिकारी या संकुलात आलिशान घर घेऊ शकतील.
म्हाडाने श्रीमंत लोकप्रतिनिधींना स्वस्तातील घरे लॉटरीत देऊ केली तेव्हा या स्वस्त घरांच्या कोट्यवधी रुपयांच्या किमती चर्चेत आल्या. मुळात सिडको किंवा म्हाडासारख्या यंत्रणा गरीब, मध्यम वर्गासाठी घरे बांधण्यासाठीच जन्माला आल्या असताना या यंत्रणा श्रीमंत मंडळींचे घर व्हावे म्हणून योजना आखू लागल्याने या यंत्रणांचा मूळ हेतूच पराभूत होत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सर्व स्तरांत उमटत आहेत.
नवी मुंबई महापालिकेसमोर असलेला भूखंड क्रमांक २० सेक्टर १५ ए बेलापूर या भूखंडावर हे अलिशान टॉवर उभारले जाणार आहे.
एकूण ३५० घरे या टॉवरमध्ये असतील. त्यामध्ये तीन आणि चार बीएचके घरांचा समावेश आहे. या घरांचे चटई क्षेत्रफळ १२७० चौरस फुट ते १८०० चौरस फुट दरम्यान असेल. शिवाय आलिशान सोयीसुविधा सिडको देऊ.
हेही वाचा :