Maratha Reservation Protest | ‘महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गृहमंत्री छत्तीसगढमध्ये…’, रोहित पवारांचा निशाणा | पुढारी

Maratha Reservation Protest | 'महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गृहमंत्री छत्तीसगढमध्ये...', रोहित पवारांचा निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले. आजचा (दि. ३१) उपोषणाचा सातवा दिवस आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये मराठा आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्तीसगढ दौऱ्यावरुन जोरदार निशाणा लावला आहे. (Maratha Reservation Protest)

Maratha Reservation Protest : भाजप राजकीय आगीत खाक

एकीकडे राज्यात मराठा आंदोलनाचा भडका उडत आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. ३०) छत्तीसगढ येथे निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. यावरुन त्यांच्यावर विरोधी गटातून जोरदार टीका केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत जोरदार निशाणा लावला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टध्ये म्हटलं आहे की, “आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय. पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात? एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?”

संबंधित बातम्या

Back to top button